Wednesday, April 24, 2024

/

बेळगावात आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

 belgaum

कॅपिटल वन सांस्कृतिक उपक्रम आयोजित “भव्य आंतरराज्य मराठी एकांकिका स्पर्धा ” २०२३

*स्पर्धेसाठी नियम व अटी*

१) भव्य आंतरराज्य स्पर्धा या स्पर्धक संघातून *छाननी व आभासी (virtual)* प्राथमिक फेरीमधून निवडलेल्या, निवडक संघात भरविण्यात येतील.

 belgaum

२)प्राथमिक फेरीसाठी एकांकिकेचा सारांश कमाल पंचवीस ओळींच्या मध्ये टायपिंग हस्तलिखित स्वरूपात पाठवावा लागेल त्याचप्रमाणे स्पर्धक संघांना एकांकिका सादरीकरणाचे चित्रण व्हाट्सअप , डीव्हीडी/सीडी अथवा ईमेल द्वारे दिनांक 18 डिसेंबर २०२२ च्या आधी पाठवावी लागेल. सदर चित्रासाठी संघांनी खालील बाबींची नोंद घ्यावी.
अ) एकांकिका चित्रीकरणाची कमाल मर्यादा १५ मिनिटे असावी यामध्ये एकांकिकेमधील विविध दृश्यांचे चित्रीकरण व्हावे.
ब) संघास एकांकिकेमधील भावलेल्या क्षणांचे चित्रीकरण असावे.
क) सदर चित्रीकरण हे मोबाईल अथवा उपलब्ध कॅमेरा मधून करावे लागेल.

३) स्पर्धेत फक्त मराठी एकांकिकांचा समावेश असेल.

४) स्पर्धा सोमवार दि. ०९ जानेवारी ते मंगळवार दि. १० जानेवारी २०२३ या कालावधीत लोकमान्य रंग मंदिर, कोनवाळ गल्ली, बेळगांव येथे भरविण्यात येणार आहे.
५) सदर स्पर्धेसाठी गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक या तीनही राज्यातील संघांना संस्था, शाळा अथवा स्वतंत्र संघामार्फत भाग घेता येईल. मात्र व्यावसायिक कलाकारास या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
६) आंतरराज्य गटातील स्पर्धक संघास प्रवेश फी रु. ५००/- व अनामत रक्कम रु. ५००/- रोख / डिमांड ड्राफ्ट /अथवा Capitalone Multipurpose Co-op. Society Ltd.,. IDBI Bank Current A/c. No. : 101102000005302 (IFSC Code : IBKL0000101) या खात्यावर जमा करावी लागेल. जमा पावतीची झेरॉक्स प्रत प्रवेश अर्जासोबत पाठविणे जरुरीचे आहे.

७)अंतिम फेरीतील सहभागी स्पर्धक संघांची अनामत रक्कम बक्षिस वितरणानंतर व्यक्तिगतरित्या दिली जाईल.त्याचप्रमाणे निवड
न झालेल्या संघाची अनामत रक्कम स्पर्धेनंतर पाठविण्यात येईल.पण तांत्रिक दृष्ट्या अपात्र संघाची अनामत रक्कम जप्त केली जाईल.

८) इच्छुक स्पर्धक संघ संस्थेच्या https://www.facebook.com/capitalone.in/ संकेत स्थळावरून e-प्रवेश उपलब्ध करून घेऊ शकतील.

९) सदर e-प्रवेश अर्ज भरून संहितेच्या प्रतिसोबत स्पर्धक संघानी email: [email protected] या संकेत स्थळावर पाठविण्याचा आहे. मात्र e-प्रवेश अर्जाची मूळ प्रत स्पर्धेआधी संयोजकांकडे रितसर
पोहचविणे गरजेचे आहे.

१०) आपल्या फॉर्मसोबत लेखकाचे संमती पत्र व एकांकिकेच्या तीन प्रती जोडणे आवश्यक आहे.
११) प्रवेश पत्रिका पाठविण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2022 आहे. याची स्पर्धक संघाने नोंद घ्यावी.
त्यानंतर आलेल्या एकांकिकेचा विचार संस्था करणार नाही.
१२) स्पर्धक संघास जुजबी नेपथ्य, प्रकाश योजना व साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिले जाईल. विशेष नेपथ्य व इतर गोष्टी स्पर्धक संघाने स्वतः आणावयाच्या आहेत इथे उपलब्ध करून देणे शक्य असल्यास त्याचे वेगळे भाडे आकारले जाईल. ते स्पर्धक संघाने देणेचे आहे. त्यासाठी स्पर्धेपूर्वी आठ दिवस आधी फोनवर विचारणा करावी.
१३) संयोजकांकडून ध्वनी व्यवस्था, जनरल लाईट, ४ स्पॉट लाईट, ३ डीमर्स, नाट्यगृहात उपलब्ध लेव्हल्स,
किरकोळ फर्निचर (एखादे टेबल, टिपॉय, खुर्ची) विनामूल्य दिले जाईल. उपलब्ध लेव्हल्स 4*4 फूट (८ इंच उंच)–४, ४×४ फूट (१० इंच उंच) ४, ४x२ फूट (१० इंच उंच ) – ३, नाट्यगृहात – १२ स्पॉट लाईट, ८ डिमर्स व १० पार लाईटस् भाड्याने उपलब्ध आहेत.

१४) खुल्या गटातील स्पर्धक संघांना एकांकिका सादर करण्यासाठी ६० मिनिटांचा वेळ दिला जाईल. यामध्ये स्टेज लावणे स्टेज काढणे आणि सादरीकरण या सर्वांचा यात समावेश आहे. याची कृपया संघानी नोंद घ्यावी.
१५) प्रवेश अर्जाच्या छाणनीनंतर सहभागी स्पर्धक संघांना सादरीकरणाचा नियोजित दिवस दिला जाईल. स्पर्धक संघांनी त्या दिवशी दिलेल्या वेळेत हजर राहून एकांकिका सादर करण्याची वेळ घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही सबबीवर प्रत्यक्ष संघा व्यतीरीक्त सादरीकरणाची वेळ दिली जाणार नाही..
१६) केवळ परगावी स्पर्धक संघाच्या पूर्व सुचनेवरून सादरीकरणाच्या दिवशी निवास व भोजन व्यवस्था नाममात्र शुल्क घेऊन करण्यात येईल.
१७) कोणत्याही प्रकारचे बेशिस्त अथवा स्पर्धेला त्रास होईल असे वर्तन केल्यास त्या संघाला ऐनवेळी स्पर्धेबाहेर करण्यात येईल.

१८) एकांकिका सादरीकरण रद्द न करण्याची हमी स्पर्धक संघाला प्रवेश अर्जासोबत द्यावी लागेल. ऐनवेळी एकांकिकेचे सादरीकरण रद्द केल्यास त्या स्पर्धक संघाची अनामत रक्कम जप्त केली जाईल व पुढील तीन वर्षे त्या स्पर्धक संघास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

१९) पारितोषिक वितरण समारंभ शेवटच्या दिवशी स्पर्धा संपल्यानंतर होईल.

२०) विजेत्या संघांनी व स्पर्धकांनी स्मृतिचिन्हे, रोख परितोषिके व प्रमाणपत्रे, पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहून स्विकारावयाची आहेत. स्मृतिचिन्हे व रोख पारितोषिके प्रत्यक्ष येऊन घेऊन जावयाची आहेत, ती कोणत्याही सबबीवर पाठविली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

२१) कोणत्याही एकांकिकेच्या माध्यमातून जात, धर्म, व्यक्ती व व्यक्ती समुह यांच्या भावना दुखविल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.तसे झाल्यास त्याची पुर्ण जबाबदारी त्या स्पर्धक संघावर राहील.

२२) परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक असेल.

२३) परीक्षकांच्या शिफारसीनुसार बक्षिसे कमी जास्त करण्याचा अधिकार तसेच वरील नियमात पुर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार संयोजकांनी राखून ठेवलेला आहे.

कॅपिटल वन (सांस्कृतिक दालन)
कॅपिटल वन मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी ती. १६४२, १ ला मजला, श्री साईकृपा बिल्डिंग अनसूरकर गल्ली, बेळगांव. ५९०००१
फोन: ०८३१-२४३४४४६, मो.: ०९३४३६४९००५,०९३४३६४९००६Marathi ekankika

कॅपिटल वन सांस्कृतिक उपक्रम आयोजित

“भव्य मराठी एकांकिका स्पर्धा २०२३”

*बेळगांव जिल्हा मर्यादीत शालेय गटासाठी स्पर्धा*

नियम व अटी:

१) सदर स्पर्धा बेळगांव जिल्हा मर्यादीत शालेय गटात भरविण्यात येतील.

२) स्पर्धेत फक्त मराठी एकांकिकांचा समावेश असेल.

३)एक कलाकारास एकाच एकांकिकेत भूमिका, व दिग्दर्शकास एकच एकांकिका दिग्दर्शीत करता येईल.

४) प्रवेश अर्जाच्या छाननीनंतर सहभागी स्पर्धक संघांना सादरीकरणाचा नियोजित दिवस, स्थळ व वेळ कळविण्यात येईल. स्पर्धक संघांनी त्या दिवशी दिलेल्या वेळेत हजर राहून एकांकिका सादर करण्याची वेळ घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही सबबीवर प्रत्यक्ष संघाच्या उपस्थिती खेरिज सादरीकरणाची वेळ दिली जाणार नाही.

५) आंतरशालेय बेळगांव जिल्हा मर्यादित गटासाठी, जिल्ह्यात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना स्वतंत्र संघ, संस्था, शाळेमार्फत भाग घेता येईल. बेळगांव जिल्हा मर्यादित स्पर्धक संघास प्रवेश फी रु. २५०/- व अनामत रक्कम रु. २५०/- रोख / डिमांड ड्राफ्ट / अथवा Capitalone Multipurpose Co-Op Society LTd; IDBI Bank Current A/C No.: 101102000005302 ( IFSC Code: IBKL0000101) या खात्यावर जमा करावी लागेल. जमा पावतीची झेरॉक्स प्रत प्रवेश अर्जासोबत पाठवीणे जरुरीचे आहे.

६) स्पर्धक संघांची अनामत रक्कम बक्षिस वितरणानंतर व्यक्तिगतरित्या परत दिली जाईल.

(७)वरील स्पर्धक संघांतील सर्व विद्यार्थ्यांचे दाखले प्रवेश अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे..

८) इच्छुक स्पर्धक संघ, संस्थेच्या https://www.facebook.com/capitalone.in संकेत स्थळावरून e-प्रवेश अर्ज उपलब्ध करून घेऊ शकतील.

९) सदर e-प्रवेश अर्ज भरून संहितेच्या प्रतीसोबत स्पर्धक संघांनी email: [email protected] या संकेत स्थळावर अथवा संस्थेच्या मुख्य कार्यालयात पाठवावी लागेल. मात्र प्रवेश अर्जाची मूळ प्रत स्पर्धेआधी संयोजकांकडे रीतसर पोहचविणे गरजेचे आहे.

१०) आपल्या फॉर्म सोबत लेखकाचे संमती पत्र व एकांकिकेच्या तीन प्रती जोडणे आवश्यक आहे.

११) प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर
२०२२ आहे. याची स्पर्धक संघांनी नोंद घ्यावी. त्यानंतर
आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार संस्था करणार नाही.

१२) शालेय गटातील स्पर्धक संघांना ४० मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्टेज लावणे, स्टेज काढणे आणि
सादरीकरण या सर्वांचा यात समावेश आहे.

१३) स्पर्धक संघास जुजबी नैपथ्य, प्रकाश योजना व साऊंड सिस्टिम उपलब्ध करून दिले जाईल. विशेष नैपथ्य व इतर गोष्टी स्पर्धक संघाने स्वतः आणावयाच्या आहेत.

१४) संयोजकांकडून ध्वनी व्यवस्था, जनरल लाईट ४ स्पॉट लाईट, ३ डिमर्स, नाट्यगृहात उपलब्ध लेव्हल्स, किरकोळ फर्निचर (एखादे टेबल, टीपॉय, खुर्ची) विनामूल्य दिले जाईल. उपलब्ध लेव्हल्स ४x४ फूट ( ८ इंच उंच) – ४, ४× ४ फूट (१०इंच उंच)-४, ४x२ फूट (१० इंच उंच )-३, नाट्यगृहात -१२ स्पॉट लाईट, ८ डिमर्स व १० पार लाईट्स भाड्याने उपलब्ध आहेत.

१५) कोणत्याही प्रकारचे बेशिस्त अथवा स्पर्धेला त्रास होईल असे वर्तन केल्यास त्या संघाला ऐनवेळी स्पर्धेबाहेर
करण्यात येईल.

१६) एकांकिका सादरीकरण रद्द न करण्याची हमी स्पर्धक संघाला प्रवेश अर्जासोबत द्यावी लागेल. ऐनवेळी एकांकिका सादरीकरण रद्द केलयास त्या स्पर्धक संघाची अनामत रक्कम जप्त केली जाईल व पुढील तीन वर्षे
त्या स्पर्धक संघास स्पर्धेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

१७) पारितोषिक वितरण समारंभ दि. १० जानेवारी २०२३ रोजी लोकमान्य रंग मंदिर येथे संपन्न होईल.

१८) विजेत्या संघांनी व स्पर्धकांनी स्मृतिचिन्हे, रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे, पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहून स्वीकारावयाची आहेत. स्मृतिचिन्हे व रोख पारितोषिके प्रत्येक्ष येऊन घेऊन जावयाची आहेत, ती कोणत्याही सबबीवर पाठविली जाणार नाहीत.

१९) कोणत्याही एकांकिकेच्या माध्यमातून जात, धर्म, व्यक्ती व व्यक्ती समूह यांच्या भावना दुखविलया जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तसे झालयास त्याची पूर्ण जबाबदारी त्या स्पर्धक संघावर राहील.

२०) परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वावर बंधनकारक असेल.

२१) परीक्षांच्या शिफारसीनुसार बक्षिसे कमी जास्त करण्याचा अधिकार तसेच वरील नियमात पूर्वसूचनेशिवाय बदल करण्याचा अधिकार संयोजकांनी राखून ठेवला आहे.

….: पारितोषिके :….
प्रथम रू.५०००/-
द्वितीय रु.२५००/-
तृतीय रु. १५००/-

* उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी (प्रथम)- रु. १०००/-
* उत्कृष्ट अभिनेता रु. १०००/- व उतेजनार्थ रु. ५००/-
* उत्कृष्ट अभिनेत्री रु. १०००/- व उतेजनार्थ रु. ५००/-
* उत्कृष्ट रंगभूषा वेशभूषा रु. १०००/- व उतेजनार्थ रु. ५००/-

प्रथम,द्वितीय,तृतीय संघ आणि उत्कृष्ट दिग्दर्शन, अभिनेता, अभिनेत्री यासाठी मानचिन्ह व सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र दिले जातील.

कॅपिटल वन (सांस्कृतिक दालन)
कॅपिटल वन मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी ती. १६४२, १ ला मजला, श्री साईकृपा बिल्डिंग अनसूरकर गल्ली, बेळगांव. ५९०००१
फोन: ०८३१-२४३४४४६, मो.: ०९३४३६४९००५,०९३४३६४९००६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.