Monday, April 29, 2024

/

*एम.ए. (मराठी) साठी प्रवेश प्रक्रिया सुरू*.

 belgaum

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (Rani Channamma University) मराठी विभागाच्या एमए 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही पदवीचा विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहे. प्रवेशासाठी दंडाशिवाय अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे.

UUCMS (https://uucms.karnataka.gov.in) मध्ये ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, आधारकार्ड, दहावीचे प्रमाणपत्र, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, पदवीचे प्रमाणपत्र, दोन फोटो यासह विद्यापीठात संपर्क साधावा, अथवा पोस्टाने पाठविल्यास युयुसीएमएसद्वारेच आलेले अर्ज स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे (9480539762), प्रा. डॉ. मनीषा नेसरकर (9900484161), डॉ. मैजोदिन मुतवल्ली (9972457859), डॉ. संजय कांबळे (9164358489) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.