Monday, April 29, 2024

/

जारकीहोळी समर्थकांचा कडाडींच्या गाडीला घेराव

 belgaum

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ या शब्दावरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर एकीकडे विरोधकांचे सुरु असलेले राजकारण आणि दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ सुरु असलेली आंदोलने यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

आज राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला सतीश जारकीहोळी समर्थकांनी घेराव घालत सतीश जारकीहोळी यांना जाणीवपूर्वक हिंदुद्वेषी म्हणून दर्शविले जात असल्याबाबत संताप व्यक्त केला.Satish supporter protest

सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ घटप्रभा येथे विविध दलित संघटनांनी आंदोलन छेडत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालत संताप व्यक्त केला. सतीश जारकीहोळी यांनी केलेले विधान चुकीचे नसून त्यांच्या या विधानाला आमचा पाठिंबा असल्याचे समर्थकांनी सांगितले.

 belgaum

सतीश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ आज घटप्रभा येथील मृत्युंजय सर्कल जवळ आंदोलन सुरु असतानाच मल्लापूरहून कल्लोळ मार्गे जाणाऱ्या इराण्णा कडाडी यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलकांनी संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.