belgaum

नुकत्याच बेंगलोर येथील बसवन गुडी आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा हिंद स्पोर्टच्या जलतरणपटूंनी घवघवीत यश संपादन करताना दहा सुवर्ण, दहा रौप्य व सात कास्य असे एकूण 27 पदकांची कमाई केली .

14 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कुमारी वेदा खानोलकर जी जी चिटणीस स्कूल हिने 50 मीटर बटरफ्लाय सुवर्ण 50 मीटर बॅक स्ट्रोक 100 मीटर बॅकस्ट्रोक 100 मीटर मिडले रिले मध्ये तीन रौप्य पदके संपादन केली .कुमारी प्रिशा पटेल डीपी स्कूल 50 मीटर फ्रीस्टाइल मध्ये सुवर्ण 200 मीटर फ्रीस्टाइल मध्ये रौप्य पदक पटकाविले.

17 वर्षाखालील मुलींच्या गटात कुमारी प्रणाली जाधव सेंट जोसेफ स्कूल हिने 50 मीटर बटरफ्लाय व 200 मीटर आय एम मध्ये 2 सुवर्ण पदके पटकाविले .

14 वर्षाखालील मुले कुमार युवराज मोहनगेकर सेंट झेवियर स्कूल याने 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड ड्रायव्हिंग मध्ये दोन स्वर्ण पदके पटकावले. कुमार अनिश काकतकर सेंट झेवि यर्स स्कूल याने 50 मीटर फ्रीस्टाइल 4×100 मीटर फ्रीस्टाईल मध्ये एकूण 3 कांस्य पदके पटकाविले. कुमार ध्रुव रेड्डी सेंट झेवियर्स स्कूल याने 50 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये 1कांस्यपदक पटकावले .

17 वर्षाखालील मुले कुमार स्वरूप धनुचे सेंटपॉल्स स्कूल याने 400 मीटर आयएम सुवर्ण 100 मीटर बटरफ्लाय 4×100 मीटर फ्री स्टाईल व मिडले रिले मध्ये 3 रौप्य व 200 मीटर बटरफ्लाय मध्ये कास्य पदके संपादली. कुमार स्वयम कारेकर हेरवाडकर स्कूल याने 50मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये सुवर्ण 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये रौप्य पदक पटकावले .

कुमार तनुज सिंग सेंट मेरी स्कूल याने 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्य पदक व 100 मीटर मध्ये कांस्यपदक पटकावले. कुमार वेदांत पाटील के एल एस स्कूल याने 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये रौप्य पदक पटकावले .Swim

कुमार मयुरेश जाधव सेंट झेवियर्स स्कूल याने 50मीटर ब्रेस्टस्ट्रोक मध्ये कास्य व 1 मीटर व 3 मीटर स्प्रिंग बोर्ड ड्रायव्हिंग मध्ये दोन सुवर्ण पदके पटकाविले .कुमारी वेदा खानोलकर, प्रिषा पटेल ,प्रणाली जाधव ,युवराज मोहनगेकर ,स्वरूप धनुचे, स्वयंम कारेकर ,तनुज सिंग, वेदांत पाटील व मयुरेश जाधव यांचे शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी अभिनंदन निवड झाली आहे.

वरील सर्व जलतरणपटूंना एन आय एस जलतरण प्रशिक्षक  विश्वास पवार अमित जाधव, शिवराज मोहिते, संदीप मोहिते, मारुती घाडी ,किशोर पाटील, रणजीत पाटील यांचे मार्गदर्शन तर एडवोकेट मोहन सप्रे शितल हुलबत्ते ,अरविंद संगोळी व सर्व शाळेचे क्रीडाशिक्षक प्रिन्सिपल व बीईओ डिग्रज सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.