Saturday, May 18, 2024

/

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट; चिन्हांकित करण्यात आला ‘तो’ स्पीड ब्रेकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडीतील सेंट्रा केअर हॉस्पिटल जवळ काँग्रेस रोडवर स्पीड ब्रेकरमुळे काल शुक्रवारी घडलेल्या एका गंभीर अपघाताच्या बेळगाव लाईव्हने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन संबंधित खात्याने आज संबंधित स्पीडब्रेकर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांनी चिन्हांकित करण्याचे काम हाती घेतल्यामुळे वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे.

नव्याने तयार करण्यात आलेला सदर स्पीड ब्रेकर चिन्हांकित न केल्यामुळे एक दुचाकी चालक सुमारे 20 फूट उडून पडल्याची घटना काल शुक्रवारी घडली होती.

या संदर्भात बेळगाव लाईव्हने वृत्त प्रसिद्ध करून शहरातील अचिन्हांकित, अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरबद्दलच्या सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रिया प्रसिद्ध केल्या होत्या.Speed breaker

 belgaum

सेंट्रा केअर हॉस्पिटल जवळ नव्याने बसविण्यात आलेल्या गतिरोधकाच्या (स्पीड ब्रेकर) रंगरंगोटीचे काम आज सकाळी युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे पहावयास मिळाले.

पद्धतीने काल घडलेल्या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन स्पीड ब्रेकर तात्काळ पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवून चिन्हांकित करण्यात येत असल्यामुळे वाहन चालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.