Tuesday, April 16, 2024

/

बार असो.ने केली मुख्य न्यायाधीशांकडे ‘ही’ विनंती

 belgaum

दिवाळीनिमित्त जाहीर करण्यात आलेल्या न्यायालयीन सुट्टीमुळे बहुतांश वकील परगावी गेले आहेत. तेंव्हा सण असल्यामुळे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना येत्या मंगळवारी 25 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहणे शक्य होणार नाही.

याची कृपया नोंद घेऊन सर्व न्यायालयांना त्याबाबतीत प्रतिकूल आदेश न काढण्याची सूचना करावी, अशी विनंती बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांनी सन्माननीय मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांना केली आहे.

दिवाळी सणानिमित्त येत्या 24 आणि 26 ऑक्टोबर 2022 रोजी न्यायालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 22 ऑक्टोबर रोजी चौथ्या शनिवारची सुट्टी आहे. या पद्धतीने रविवार धरून येता मंगळवार वगळता सलग चार दिवस न्यायालयाला सुट्टी आहे.

 belgaum

तथापि सणानिमित्त परगावी गेलेल्या वकिलांना मंगळवारी 25 रोजी एका दिवसासाठी न्यायालयात हजर राहणे अवघड जाणार आहे. यासाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. यतनट्टी यांनी वरील प्रमाणे मुख्य न्यायाधीशांकडे विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.