Friday, March 29, 2024

/

शालेय विद्यार्थिनींच्या साजरी केली अनोख्या पद्धतीने दिवाळी

 belgaum

श्री मंगाई देवी युवक मंडळ-मंगाई देवस्थान या मंडळातील दोन शालेय विद्यार्थिनींनी दिपावलिनिमीत्त एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Deewali savvasheri स्फुर्ती विश्वनाथ सव्वाशेरी (ईयत्ता. 7 वी बालिका आदर्श स्कूल) राहणार वडगाव,व प्रणाली परशराम कणबरकर(ईयत्ता.10वी डिवाईन मर्सी) राहणार मच्छेअशी या दोघी विद्यार्थिनींची नाव आहेत

या दोन विद्यार्थिनींनी त्यांना शिवजयंती उत्सवावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या बक्षिसाचा सदुपयोग करत जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निराश्रीत केंद्रामध्ये दिपावलीचा सण साजरा केला.

 belgaum

केंद्रातील सदस्यांच्या वतीने दिवाळी निमीत्त भारतमाता पुजन,दिपोत्सव कार्यक्रम व रात्री भोजनाचा आस्वाद असा सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.

श्रेया सव्वाशेरी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनोद शानबाग,रमेश धोत्रे, समुदाय संघटना अधिकारी प्रकाश मरीकट्टी तसेच केंद्र प्रमुख रावसाहेब शिरहट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. लहान मुलांनी शाळेच्या जीवनातच इतरांची काळजी आणि समाजाची आवड पाहिजे हे या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.