Thursday, June 20, 2024

/

हवी तर याची लोकायुक्त चौकशी करा:मुख्यमंत्री

 belgaum

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दिवाळीत पत्रकारांना मोठ मोठी भेटवस्तू दिल्याचा आरोप केल्या नंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरही दिवाळीच्या निमित्ताने पत्रकारांना रोख रक्कम भेट दिल्याचा आरोप झाला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू, पैसे वाटप करण्याच्या कसल्याही सूचना मी दिल्या नव्हत्या. हवी तर याची लोकायुक्त चौकशी होऊन जाऊ दे, आम्ही त्याला तयार आहोत असे आव्हान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसला दिले.

रविवारी मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, पत्रकारांना भेटी दिल्याप्रकरणी बोलण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही.मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तूसोबत पैसे दिल्याबाबत काँग्रेसने ट्विट केले होते, या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना, काँग्रेसवर टूल किटचा परिणाम झालाय. खोटेपणा निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. मी कोणालाही भेटी, पैसे देण्याची सूचना दिलेली नाही.

 belgaum

काँग्रेस सत्तेवर असताना अनेकांना काय भेटवस्तू दिल्या हे उघड झाले आहे.वृत्तपत्रांतूनही त्याची बातमी येते. त्यांनी पत्रकारांना आयफोन, लॅपटॉप आणि सोन्याची नाणी दिली. त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कोणीतरी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून त्याची चौकशी केली जाईल. याचा अर्थ सर्व पत्रकारांना भेटवस्तू मिळाल्या असा अर्थ काढणे योग्य नाही.

काल काँग्रेसच्या प्रवक्त्याने त्याचा अतिशय वाईट अर्थ लावला आणि मी त्याचा निषेध करतो, असे ते म्हणाले.ते म्हणाले की, ओबीसींचा भाजपला मोठा पाठींबा मिळाला आहे. म्हणूनच कलबुर्गीमध्ये ओबीसी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष आणि कोअर कमिटीने निर्णय घेतल्यानुसार, नोव्हेंबर महिन्यात बेळ्ळारी येथे अनुसूचित जमातीचे अधिवेशन आहे. त्यानंतर अनुसूचित जातीचे अधिवेशन होणार आहेअसे त्यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.