Monday, July 15, 2024

/

उद्या गोगटे स्मृती भव्य टॉप टेन करेला स्पर्धा

 belgaum

लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक, मार्केट -बेळगाव येथील श्री सार्वजनिक गणपती उत्सव मंडळातर्फे उद्या शुक्रवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कै. रावसाहेब गोगटे यांच्या स्मरणार्थ 6 वी भव्य टॉप टेन करेला स्पर्धा -2022 आयोजित करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे ही करेला फिरवण्याची मर्दानी स्पर्धा होणार आहे.

खुल्या गटात घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कम, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे प्रत्येकी 5000, 3000 व 2000 रुपये तर उर्वरित सात विजेत्यांना प्रत्येकी 1000 रु. रोख दिले जाणार आहेत. स्पर्धेसाठी आयोजकांनी निवडलेला करेलाच वापरात येईल.Karela

सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यायामपटूंनी प्रवेश शुल्क 100 रुपयांसह आपली नावे उद्या शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदवावयाची आहेत. नांव नोंदणीसाठी इच्छुकांनी अजित सिद्धण्णावर (मो. क्र. 9844063043) झेंडा चौक मार्केट अथवा सुनील राऊत (मो. क्र. 9620407700) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.