Friday, April 26, 2024

/

अंगणातील विहिरीत पडून एकाचा मृत्यू! तीन दिवस मृतदेह विहिरीत!

 belgaum

बेळगाव : अंगणातील विहिरीतून पनू काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील पांगुळ गल्ली परिसरात घडली आहे. आश्चर्य म्हणजे तीन दिवस मृतदेह विहिरीतच असूनही कुटुंबियांना याबद्दल माहिती नसल्याचे समोर आले आहे.

बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील रहिवासी संजय पाटील (वय ४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत संजय पाटील या व्यक्तीला मद्यपानाची अधिक सवय होती. अशा अवस्थेत दोन तीन दिवस घराकडे फिरकत नसल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. मृत संजय पाटील हे भाजीविक्री देखील करत होते.

यामुळे सकाळी भाजी विक्रीसाठी नेहमीप्रमाणे जाऊन संध्याकाळी घरी परततील या विचारात असलेल्या कुटुंबियांना तीन दिवस मृतदेह विहिरीतच असूनही थांगपत्ता लागला नाही. तीन दिवसांनंतर शनिवारी सकाळी शेजारची महिला पाणी आणण्यासाठी गेली असता विहिरीत मृतदेह आढळून आला आहे.

 belgaum

यानंतर हि बाब आसपासच्या परिसरात समजली. घटनास्थळी मार्केट पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शवागारात पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.