Friday, April 19, 2024

/

उचगावात 5 झाडांची कत्तल! वन खात्याकडे फिर्याद

 belgaum

उचगाव (ता. जि. बेळगाव) येथील मळेकरणी हायस्कूलच्या आवारातील पूर्ण वाढ झालेली पाच मोठी झाडे अचानक तोडून जमीनदोस्त करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र समता व्यक्त होत आहे.

उचगाव येथील मळेकरणी हायस्कूलच्या आवारामधील गेल्या सुमारे तीन दशकांपूर्वी लावण्यात आलेली पाच मोठी झाडे वातावरण स्वच्छ हवेशीर ठेवण्याबरोबरच शितल सावली देत होते. मळेकरनी हायस्कूल आवाराच्या सौंदर्यात भर घालणारे ही झाडे कांही लोकांनी वन खात्याची परवानगी न घेता नुकतीच अचानक बुंध्यातून तोडून टाकली आहेत.

शाळा आवारातील वृक्ष बेकायदेशीर येतात तोडण्यात येत असल्याची माहिती मिळतात काकती पोलीस आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मळेकरणी हायस्कूलकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत संबंधित पाचही झाडांची कत्तल करण्यात आली होती.Tree cut

 belgaum

सदर प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून झाडांची कत्तल करणाऱ्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, रेंज फॉरेस्ट ऑफिसर पुरुषोत्तम राव यांनी संबंधित झाडे तोडण्यासाठी वापरलेले मशीन आणि झाडाच्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ वृक्ष प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.