Saturday, April 20, 2024

/

अखेर गणेश विसर्जन तलाव झाला स्वच्छ!

 belgaum

गेल्या मंगळवारी रात्री मुसळधार पावसाचे रस्त्यावरील सांडपाणी पवित्र कपिलेश्वर तलावामध्ये मिसळण्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत अनेकांच्या प्रयत्नाने या तलावाची स्वच्छता झाली आहे गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

भाजप नेते किरण जाधव यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे विनंती केली होती त्याच बरोबर मध्यवर्ती गणेश महामंडळाने,स्थानिक नगरसेवक वैशाली भातकांडे व कपिलेश्वर मंदिर ट्रष्ट कमिटीदेखील पाठपुरावा केला होता.गेल्या मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील सांडपाणी कपलेश्वर तलावामध्ये मिसळल्यानंतर या तलावाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच आमदार ॲड बेनके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील सांडपाणी कपलेश्वर तलावामध्ये मिसळल्यानंतर या दूषित पाण्याचा युद्ध पातळीवर उपसा करण्यात आल्यानंतर आज पुन्हा एकदा तलावाची स्वच्छता करण्यात आली. तलावात दूषित पाणी शिरल्याच्या घटनेनंतर आमदार ॲड. अनिल बेनके यांनी तलावाच्या ठिकाणी भेट देऊन उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्यामुळे काल रात्री आणि आज सकाळी तलावातील दूषित सांडपाणी व कचरा काढून तलावात पुन्हा पाणी भरण्याचे काम हाती घेण्याचा आले.Old ganesh tank

या पद्धतीने आमदारांनी कपलेश्वर तलाव पुन्हा स्वच्छ करून श्री अनंत चतुर्दशीच्या श्री विसर्जनासाठी सज्ज करून दिला आहे. त्यांच्या या कर्तव्य दक्षतेबद्दल गणेश भक्तात समाधान व्यक्त होत आहे.

आमदार बेनके यांनी कपलेश्वर तलावाला दिलेल्या भेटी प्रसंगी त्यांच्यासमवेत नगरसेविका वैशाली भातकांडे, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे, महापालिका आणि एल अँड टी कंपनीचे संबंधित अधिकारी संबंधित अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.