Wednesday, May 1, 2024

/

हलगा सुवर्णसौध समोर गर्दी

 belgaum

75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हलगा येथील सुवर्ण सौध इमारतीला केलेली तिरंगामय विद्युत रोषणाई पहाण्यासाठी बेळगाव शहर परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

आकर्षक अशी तिरंगी विद्युत रोषणाई, समोरील बाजुने लेझर लायटिंग यामुळे सुवर्णसौधसह आसपासचा परिसर देखील उजळून निघाला होता. यावेळी या परीसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोमवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वच शासकीय इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली होत. यंदा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त 3 दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.Rush suvarna soudha

 belgaum

गेल्या तीन दिवसापासून हलगा येथील सुवर्ण सौधला उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या रोषणाईचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असून सदर सजावट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

त्यामुळे सोमवारी सायंकाळी महामार्गावर वाहनांची गर्दी ठिकाणी झाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.