Tuesday, April 16, 2024

/

पाटील गल्लीतील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा फटका!

 belgaum

मुसळधार पावसामुळे बेळगावमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून मूलभूत आणि पायाभूत सुविधांकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने शहरातील पाटील गल्ली परिसरात ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याचा प्रकार घडला आहे.

ड्रेनेज फुटल्यामुळे किंवा ब्लॉक झाल्याने गटारीतून पावसाच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होत नसून परिणामी गटारीबाहेर हे पाणी वाहत जाऊन रस्त्यावर आले आहे. शिवाय रस्त्यावरील हे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने याचा फटका या भागातील नागरिकांना बसला आहे.

शनी मंदिराच्या समोरील बाजूला असलेल्या घर क्रमांक ५६१ / ६२ चिराग पोरवाल यांच्या घरात पाणी शिरून घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 belgaum

येथील स्थानिकांच्या म्हणण्या नुसार या भागातील लोकांना पैसे किंवा नुकसान भरपाईची गरज नाही. परंतु याच नुकसान भरपाईच्या रकमेतून नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही आणि नागरिकांनाही याचा त्रास होणार नाही, यामुळे या भागात गटारीचे सोय व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.Patil galli drainage problm

या भागात उद्भवलेल्या समस्येनंतर आमदार बेनके यांनी फोर्ट रोड खताल वलिषा दर्गा समोरील गटारीची पाहणी केली. यानंतर या गटारीचे तात्काळ दुरुस्ती करण्याची सूचनाही दिली. मात्र याच परिसरापासून जवळ असलेल्या पाटील गल्लीत ते फिरकले नाहीत, याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

पाटील गल्ली येथील गटारी ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी वाहून न जात घराघरात शिरत आहे. ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने येथील नागरिक सध्या हैराण झाले आहेत. हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी विनंती पाटील गल्ली येथील रहिवासी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.