बेळगावमध्ये आठवड्याभरात तिसरा अपघात झाला असून मोदगा पंतनगर या परिसरात टिप्पर आणि दुचाकीमध्ये धडक बसून अपघात घडला आहे.
समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात विठ्ठल गणपती ढवळी (वय २५, सध्या रा.सुळेभावी, मूळचा कित्तुरचा) या युवकाचा मृत्यू झाला आहे.
रात्री ९.४५ च्या दरम्यान अपघात घडला आहे. बेळगावहून सदर युवक सुळेभावीच्या दिशेने जात असता बेळगावच्या दिशेने येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.
दुचाकीवरील दोघांपैकी एकाच मृत्यू झाला असून आणखी एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना मारिहाळ पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
*बेळगावमधील रस्ते आणखी किती बळी घेणार?*