Thursday, April 25, 2024

/

‘वन खात्याने रचला साफळा’

 belgaum

शुक्रवारी दुपारी जाधवनगर परिसरात वावर असलेल्या बिबट्याची पकडण्यासाठी शोधमोहीम दिवसभर राबवण्यात आली मात्र अद्याप वन खात्याचा टप्प्यात बिबट्या आलाच म्हणून शोध पथकाने साफळा लावला आहे.साफळ्यात त्याचे आवडते खाद्य कुत्रे बांधून ठेवले आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने रात्री देखोल शोध मोहीम जारी ठेवली आहे.या परिसरातील झाडा झुडुपात साफळा लावण्यात आला आहे.दरम्यान वन खात्याला बिबट्याचा शोध घेताना दमछाक झाली आहे.

बिबट्या बेळगाव शहरात दाखल झाल्याने एकीकडे या भागांतील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे या भागांत रेस कोर्स मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे जवळपास जंगल सुरू होतो या ठिकाणाहून बिबट्या आला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.

 belgaum
Leapord
बेळगाव जाधव नगर येथील झुडुपात बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने असा रचला आहे साफळा

मागील दोन वर्षापूर्वी इंडाल कॉलनीत देखील बिबट्या सदृश्य प्राणी दिसला मात्र नंतर तो रान मांजर असल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे जाधवनगर परिसरात बेळगावात पहिल्यांदाचं बिबट्या दिसला आहे.

बेळगाव शहर हे जंगल प्रदेश म्हणून ओळखला जातो बेळगाव जवळील जंगले वन जीवींनी समृद्ध आहेत काही काळा पूर्वी कोल्हापूरात पट्टेरी वाघ दाखल झाला होता तशी परिस्थिती बेळगावातही निर्माण होण्याच्या आधी योग्य पाऊले उचलण्याची गरज आहे.नागरिकांनीही वन्य प्राण्यांच्या पासून सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे हे आहे त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येवर हालचालींवर नजर ठेवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.