Wednesday, May 8, 2024

/

‘पावसातही झेंडा उंचा रहे’चा उत्साह .. फडकला देशातील सर्वात उंच तिरंगा

 belgaum

वरून कोसळणारा मुसळधार पाऊस, शेकडो विध्यार्थी, मनपाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी उत्तरचे आमदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज किल्ला तलावा वर फडकावण्यात आला. ७५ व्या अमृतमहोत्सवा निमित्त 110 मीटर उंच ध्वजस्तंभावर 9600 चौरस फुटांचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.36.60×24.40 (120×90 फूट = 9600 चौरस फूट) आकाराचा तिरंगा ध्वज आकाशात 110 मीटर उंच ध्वज खांबावर फडकवण्यात आला तर पार्श्वभूमीत वंदे मातरम् गीत वाजले आणि उत्तेजित जमावाने भारत माताकी जयचा जयघोष केला.

देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हर घर तिरंगा च्या माध्यमातून आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे.दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात येणार असून बेळगाव मध्ये देशातील सर्वात उंच झेंडा फडकवून या महोत्सवला सुरुवात करण्यात आली.बेळगाव वासियांसाठी अभिमानाची मानली जाणारी बाब म्हणजे देशातील सर्वात उंच ध्वज म्हणजेच 110 मीटर उंचीचा ध्वज यावेळी फडकविण्यात आला.

किल्ला तलाव परिसरात आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते सदर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. महानगरपालिका आणि बुडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आजादी का अमृत महोत्सवाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या ऐतिहासिक सोहळ्याला राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थिती दर्शवत सर्वात उंच ध्वजाला मानवंदना दिली.पावसाने हा ध्वज कायमस्वरूपी फडकावण्यास अडचणी येत आहेत मात्र यापुढे कायमस्वरूपी फडकावण्यासाठी प्रयत्न केले जाती असे आश्वासन आमदार अनिल बेनके यांनी दिले.Fort lake flag

 belgaum

प्रारंभी अनिल बेनके यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. राष्ट्रभक्ती आणि राष्ट्र प्रेमाने हा सोहळा अधिकच खुलून गेला बेळगाववासियांसाठी अभिमानाची मानली जाणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला.

किल्ला तलाव परिसर पाना फुलांनी तसेच केसरी पांढऱ्या हिरव्या रंगाच्या फुग्यांनी सुशोभित करण्यात आला होता. ध्वज फडकवताच तिरंगा ध्वज रंगाचे फुगे आकाशात उडविण्यात आले. आनंदी आणि उत्साही वातावरणात विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते सादर केली. यामुळे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेला हा सोहळा अधिकच सुंदर बनला.Tri colour fort lake

७५ मीटर लांब तिरंग्याची पदयात्रा

ध्वजारोहणानंतर ७५ मीटर लांबीच्या तिरंगाध्वजाची पदयात्राकिल्ला तलाव प्रांगणातून जिल्हाधिकारी कार्यालय चेन्नम्मा सर्कलपर्यंत निघाली.

या पदयात्रेत अनेक मान्यवर, अधिकारी व नागरिकांसह विविध शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.सम्राट अशोक सर्कल, R.T.O. ही मिरवणूक चक्राकार मार्गाने फिरत जिल्हाधिकारी कार्यालय ते चेन्नम्मा सर्कलपर्यंत आली. रस्त्याच्या कडेला जमलेल्या लोकांनी वंदे मातरम आणि भारत मातेचा जयघोष केला.मुलांनी ७५ मीटर लांबीचा तिरंगा घेऊन मिरवणूक काढल्याने नागरिकांनी दोन्ही बाजूंनी फुलांची उधळण करून देशभक्ती दाखवली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.