बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्सच्या संचालकपदी डॉ अशोक शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिम्सच्या संचालक आणि डीनचे पद कित्येक दिवसापासून रिक्त होते त्या ठिकाणी बिम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ अशोक शेट्टी यांची नियुक्तीचा आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याचे अधिन कार्यदर्शी यांनी बजावला आहे.
डॉ शेट्टी यांनी या अगोदर बीम्स मध्ये प्रोफेसर म्हणून सेवा बजावली आहे तत्कालीन बीम्सचे प्रभारी आणि प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिश्वास यांच्या बदलीनंतर बिम्सच्या प्रशासकीय मंडळामध्ये डॉ शेट्टी यांची नियुक्ती हा एक महत्त्वाचा बदल आहे.
बेळगाव शहर परिसर तालुका आणि जिल्ह्यातल्या लोकांसाठी बीम्सचे संचालक हे खूप महत्त्वाचे पद आहे शेकडो रुग्णावरून दररोज होणारे उपचार तिथे असणाऱ्या सुविधा यासाठी बीम्स संचालकांचा मोठे योगदान असते.
आदित्य आम्लांन बिश्वास यांनी बिम्सच्या कारभारात अमूलाग्र सुधारणा केल्या होत्या आता डॉ शेट्टी यांच्याकडे बीम्स चालवण्याची जबाबदारी असणार आहे.