belgaum

गुलमोहर बागतर्फे 6 पासून “तिची कहाणी” चित्रकृती प्रदर्शन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गुलमोहर बाग, बेळगाव या कलाकारांच्या संघातर्फे परंपरांना आव्हान देणाऱ्या आणि धाडस आणि धैर्याचे प्रतीक असलेल्या महिलांच्या गौरवार्थ येत्या शुक्रवार दि. 6 ते रविवार दि. 8 मार्च 2026 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत “तिची कहाणी” (हर स्टोरी) या शीर्षकाखालील चित्रकृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिळकवाडी येथील हेरवाडकर शाळेजवळील वरेकर नाट्य संघाच्या कलामहर्षी के.बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या प्रदर्शनात गुलमोहर बागच्या फक्त महिला कलाकारांच्या चित्रांचा समावेश असणार आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी 6 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे याप्रसंगी उद्घाटक म्हणून बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका कविता वारंगळ, आश्रय फाउंडेशनच्या संस्थापक नागरत्ना रामगौडा आणि दंत शल्यचिकित्सक व आरोग्य शिक्षिका वर्षा साठे या उपस्थित राहणार आहेत.

 belgaum

प्रदर्शनाच्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये पुढील प्रमाणे महिला कलाकार दररोज सायंकाळी 5 वाजता चित्रकृती बनवण्याची प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत. पहिल्या दिवशी दि. 6 मार्च रोजी : आर्ट पावडर मीडियममध्ये स्मिता नाडकर्णी यांचे प्रात्यक्षिक,

दि. 7 मार्च रोजी : अंजली पवार यांचे नाईफ पेंटिंग प्रात्यक्षिक, दि. 8 मार्च रोजी : मल्टी मीडियामध्ये शशिकला यांचे प्रात्यक्षिक. तरी कलाप्रेमींनी गुलमोहर बाग कलाकारांच्या या प्रत्यक्ष चित्रकला प्रात्यक्षिकांचा अनुभव घेण्याबरोबरच प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन स्त्रीत्वाच्या या रंगीत उत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.