belgaum

मराठा सेंटर बेळगाव येथे होलिका दहनासह होळी साजरी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे अधिकारी, जेसीओ, ओआर आणि त्यांच्या कुटुंबियांनी होलिकोत्सव पारंपरिक पद्धतीने भक्तीभावाने उत्साहात साजरा केला.

एमएलआयआरसी अर्थात मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारे होलिका दहन पारंपारिक विधी आणि प्रार्थनांसह भक्तीभावाने साजरे करण्यासाठी वरिष्ठ लष्करी अधिकारी, जेसीओ, ओआर आणि त्यांचे कुटुंबीय काल मंगळवारी एकत्र आले होते.

या कार्यक्रमात एकता, विश्वास आणि शाश्वत रेजिमेंटल नीतिमत्तेचे प्रतिबिंब दिसून येत होते. त्यानंतर मराठा रेजिमेंटल सेंटरमध्ये रंग, संगीत आणि सामायिक उत्साहाने रंगलेली धुळवड उत्साह व जल्लोषात पार पडली. ज्यामध्ये एमएलआयआरसीचे सेवारत लष्करी अधिकारी, जवान, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उस्फुर्त सहभाग दर्शवला होता.

 belgaum

एकमेकांवर रंगांची उधळण करत सर्वांनी सौहार्द आणि परस्पर आदराचे बंध मजबूत केले. खुद्द एमएलआयआरसी बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी देखील आपले पद विसरून सहकारी अधिकारी व जवानांना रंग लावत धुळवडीचा आनंद मनमुराद लुटला.

या होलिकोत्सवातून सुसंवाद आणि सद्भावनापूर्ण वातावरणात भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा साजरी करणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमधील बंधुत्व आणि एकजुटीचे पुन्हा एकदा दर्शन घडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.