Wednesday, May 8, 2024

/

बेळगावातील या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश

 belgaum

राज्यातील १०८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश राज्य पोलीस महासंचालकांनी बजावला आहे त्यात बेळगाव शहरातील एका पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.पोलीस महा संचालकांच्या वतीने डॉ एम ए सलीम यांनी हा बदल्यांचा आदेश बजावला आहे.

या पूर्वी उद्यमबाग पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले दयानंद शेगुनशी यांची जोयडा हुन टिळकवाडी पोलीस निरीक्षक पदी बदली झाली आहे.

सध्याचे टिळकवाडी पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांची ए सी बी बदली झाली आहे. दयानंद शेगुनशी यांनी लॉक डाऊन काळात उध्यमबाग पोलीस निरीक्षक म्हणून छाप पाडणारे कार्य केले होते.

 belgaum

रवींद्र नायकवाडे यांची विजापूर हुन अथणी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी एका सूची जाहीर झाली होती त्यात बेळगाव सी ई एन पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांच्या बदलीचा आदेश बजावण्यात आला होता आता पंधरा दिवसात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची ही दुसरी मोठी यादी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.