Friday, March 29, 2024

/

‘बेळगाव लाईव्ह’च्या बातमीचा लाईव्ह इम्पॅक्ट!

 belgaum

बेळगावमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने दखल घेत अवजड वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळवत अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर घालण्याचे काम हाती घेतले होते. अपघातात बळी गेल्यानंतर रहदारी विभाग आणि प्रशासनाला खडबडून जाग आली आणि लगोलग अनेक ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्यात आले.

पण मग पुढे काय? हा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले होते. हे कामकाज पूर्ण होऊनही एकेरी वाहतूक सुरु करण्यात आल्याने पुन्हा अपघाताला आमंत्रण देण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

यासंदर्भात सोमवारी (८ ऑगस्ट) ‘बेळगाव लाईव्ह’ ने बातमी प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत प्रशासन आणि रहदारी विभागाने वाहतूक पूर्ववत सुरु केली असून सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

 belgaum

रस्ते अपघातात दोन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. आणि अपघात मार्गावर गतिरोधक बसवून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. हि एकेरी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली. मात्र ज्या मार्गाने हि वाहतूक वळविण्यात आली त्या मार्गावरदेखील सेंट पॉल आणि सेंट जोसेफ या दोन शाळा आहेत.Camp road

या मार्गावरून हि वाहतूक वळविण्यात आल्याने ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार निर्माण झाला होता. तातडीने प्रशासनाने दखल घेऊन गतिरोधक बसविले, काँक्रिटीकरणही झाले..गतिरोधक बसविलेल्या रस्त्याचा वापर करण्यास काहीच हरकत नसून, गतिरोधकाच्या दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरु करण्यात यावी, जेणेकरून अवजड वाहनांची वाहतूक पुन्हा शाळेच्या मार्गावरून होऊ नये, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवून तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली होती.

प्रशासनाने सदर गतिरोधकांचे काम अशास्त्रीय रित्या केल्याचीही तक्रार नागरिकांतून होत असून तूर्तास ‘बुडत्याला काडीचा आधार’! अशी धारणा नागरिकांमध्ये झाली आहे. या गतिरोधकांसह या रस्त्याची दुरवस्था निदान हा पावसाळा संपेपर्यंत तरी नाही झाला तर उत्तम अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

काल बेळगाव live ने प्रसिद्ध केलेली न्यूज अशी

*स्पीड ब्रेकर बसविले.. वाहतूकही वळविली आता पुढे काय?*

स्पीड ब्रेकर बसविले.. वाहतूकही वळविली आता पुढे काय?

Previous article
बिबट्याचा वावर … त्या २२ शाळांना बुधवारी सुट्टीचा आदेश गोल्फ क्लब जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने बुधवारी १० आगष्ट रोजी गोल्फ क्लब जंगल परिसरातील २२ शाळाना सुट्टी देण्यात येईल असा आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड याची बजावला आहे. बिबट्याचा आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ क्लब जवळील शहरातील १३ आणि ग्रामीण भागातील ९ अश्या एकूण २२ शाळांना बुधवारी सुट्टी असणार आहे. सूयुतीची कल्पना पालकांना आधीच मिळावी यासाठी एक दिवस अगोदर हा आदेश जारी करण्यात आल्याचे देखील शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.वन खात्याच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी शोध मोहीम जोरात सुरु आहे. बुधवारी १० रोजी या खालील शाळांना सुट्टी असणार आहे. केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 आणि वनिता विद्यालय,मराठी विद्यानिकेतन,एन पी ई टी क्लब रोड के एल ई इंटरनॅशनल स्कुल कुवेम्पू नगर,सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर,सरकारी मराठी शाळा सदाशिवनगर यासह हनुमान नगर,सह्याद्री नगर ,कुवेम्पू नगर आणि सदाशिवनगर कन्नड प्रथिमक,सेंट झेवियर्स स्कुल, दूरदर्शन नगर कन्नड प्राथमिक शाळा आणि हिंडलगा ग्राम पंचायतीतील शाळांना अशा एकूण २२ शाळांना बुधवारी सुटटी देण्यात आली आहे . सोमवारी अतिवृष्टी आणि मंगळवारी मोहरम अशी दोन दिवस सुट्टी संपल्यावर बुधवारी शहर आणि तालुक्यातील त्या २२ शाळा वगळता उर्वरित शाळा आता सुरु राहणार आहेत. पोलीस विभागाने रेसकोर्स आणि गोल्फ कोर्सच्या आजूबाजूच्या भागात विशेषत: जाधव नगर, हनुमान नगर, आणि जलतरण तलाव आणि आतापर्यंत बिबट्या दिसलेल्या ठिकाणी जारी केलेला अलर्ट पुढे ठेवला आहे पोलिसांनी हनुमान नगर, जाधव नगर आणि आजूबाजूच्या परिसरांना बिबट्याच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे, स्थानिक रहिवाशांना विशेषत: अंधारात आणि पहाटेच्या वेळी विनाकारण फिरू नये असा इशारा दिला आहे.
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.