Saturday, April 20, 2024

/

8 रोजी न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

 belgaum

मराठी भाषेतून सरकारी परिपत्रके मिळावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ ऑगस्‍ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे.

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवारी मराठा मंदिर येथे पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी किणेकर म्‍हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून देखील मराठीतून कागदपत्रे देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच वेळेत कागदपत्रे न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाला मराठी भाषिकांची ताकद पुन्हा एकदा दाखवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोहरम निमित्त ९ ऑगस्‍टला सरकारी सुट्टी असल्याने ८ ऑगस्‍ट रोजी ठिय्‍या आंदोलन छेडले जाणार आहे. या आंदोलनामध्ये तालुक्याच्या विविध भागातून मराठी भाषिकांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी आपाल्या भागात जनजागृती करावी.Mes meeting

ऍड राजाभाऊ पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर एम चौगुले यांनी मनोगत व्‍यक्त केले. त्‍यांनी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घ्यावी. त्‍यासाठी जागृती करण्‍यात यावी, असे आवाहन केले.

बैठकीला म्‍हात्रू झंगरुचे, एस. एल. चौगुले, आर. आय. पाटील, एपीएमसी माजी सदस्‍य आर. के. पाटील, कृष्‍णा हुंदरे, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, अंकुश पाटील, अनिल हेगडे, रावजी पाटील, पिराजी मुचंडीकर, माणिक होनगेकर, निंगाप्‍पा जाधव, नानू पाटील आदी उपस्‍थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.