Sunday, April 28, 2024

/

सौन्दत्ती मंदिर पुजाऱ्यांची बेळगाव रेणुका देवी मंदिराला भेट

 belgaum

जुन्या पी बी रोड तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात देखील विशेष शक्ती असल्याचे मत सौन्दत्ती श्री रेणुका देवी मंदिराचे पुजारी के एस यडोरय्या यांनी व्यक्त केले.गुरुवारी सकाळी त्यांनी बेळगाव तानाजी गल्ली श्री रेणुका देवी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

बेळगाव जिल्हा सह कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिरात के एस यडोरय्या हे दिन नित्य पूजा पौराहित्य करत असतात त्यांनी बेळगावातील रेणुका देवी मंदिरात विशेष पूजा केली. Renuka devi temple

बेळगावच्या रेणुका देवी ट्रष्ट कमिटीचे अध्यक्ष राहुल मुचंडी यांनी सौन्दत्ती मंदिराचे पुजारी यडोरय्या यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी यडोरय्या बेळगाव मंदिराच्या जिर्णोद्धार कामाची पाहणी केली.

 belgaum

ओल्ड पी बी रोड ब्रिजच्या खालील श्री रेणुका देवी मंदिराचा जीर्णोद्धाराचे चे काम अनेक भाविकांकडून दिलेल्या मदतीतून सध्या जोरात सुरू आहे.यावेळी प्रकाश प्रभूंनावर सुनील हलगेकर रायनगडा पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.