उद्यमबाग येथील आर इ सी फ्लो टेक्नॉलॉजी एल एल पी चे मालक मधु हाशिलकर यांनी वृद्धांसाठी कार्यरत असलेल्या शांताई वृद्धाश्रमाला मदत दिली आहे.
त्यांनी आपल्या कार्यालयात कार्यरत असणारे कर्मचारी राजू पाटील व शोभा बांदीवडेकर यांच्या हस्ते 3 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश आश्रमाला देऊ केला केला आहे. सदर रक्कमेचा चेक आपण न देता कर्मचाऱ्यांकडून देऊ केला आहे. संतोष ममदापूर बसव बानीगा व विजय मोरे यांच्याकडे सदर रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी बोलताना राजू पाटील यांनी हाशिलकर कुटुंबीयांनी वृद्धाश्रमाला भेट दिल्यापासून संस्थेला मदत करण्याचे ठरविले होते.गेली 24 वर्षापासून शांताई वृद्धाश्रम कार्यरत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
कोणतीही सरकारी मदत तसेच नसताना देखील केवळ देणगीदारांच्या मदतीतून हे आश्रम वृद्धांची सेवा करत असून त्यांच्या कार्याला मदत म्हणून सदर धनादेश देण्यात आल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.
यावेळी आश्रमातर्फे संतोष ममदापूर यांनी एलएलबी चे मालक मधु हाशिलकर व कुटुंबीयांचे तसेच कंपनीतील कर्मचारी वर्गाचे आभार मानत समाधान व्यक्त केले.