Friday, September 20, 2024

/

या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बेळगाव मधून बदली

 belgaum

सीनियर आयएएस अधिकारी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे संचालक असलेले आदित्य आम्लांन बिश्वास यांची बेळगाव मधून बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे.

सोमवारी सायंकाळी कर्नाटक राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला असून त्यात बेळगावचे प्रादेशिक आहेत आयुक्त आदित्य आम्लान बिश्वास यांचा समावेश आहे.विश्वास आता बेंगळूरचे रीजनल कमिशनर असणार आहेत बेंगलोरचे प्रादेशिक आयुक्त नवीन राजसिंह यांच्या जागी ते पदभार स्वीकारणार आहेत.

गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी बेळगावसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. कोरोना काळामध्ये बिम्सचे वाभाडे निघाले होते त्यानंतर जून 2021 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी बिश्वास यांच्याकडे बीम्स संचालक पदाची धुरा दिली होती त्यानंतरचं इस्पितळ प्रशासनात अमूलाग्र बदल घडवत
त्यांनी सुधारणा केली होती आणि या दोन वर्षांमध्ये बिम्सचा देशात सातवा क्रमांकांवर आणून ठेवलं आहे त्याचे बऱ्यापैकी श्रेय बिश्वास यांना जाते.

AAdity amlan biswas
सामान्य जनतेच्या समस्यांची दखल घेणारे एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती विशेषता कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता ते बेधडकपणे काम करत होते.

गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या कर्तव्यदक्षपणामुळे त्यांनी अनेक सामान्य जणांना न्याय मिळवून दिला होता विशेष करून बेळगाव शहरात मूलभूत सुविधा मिळवून देण्यात, बीम्स संचालक जबाबदारी घेऊन काम केलं होतं. बिश्वास यांच्याकडे गेल्यास सामान्य जनतेला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास त्यांच्याबद्दल सामान्य जनतेत निर्माण झाला होता जनतेच्या समस्याला ते तात्काळ प्रतिसाद देत होते. बेळगाव स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी अनेकदा सूचना करून कामात सुधारणा करायला लावल्या होत्या.अश्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची कमी बेळगावला नक्कीच भासणार यात शंका नाही.

तिसऱ्या लाटेसाठी बिम्स कडून उपाययोजना

बिश्वास बिम्सची सर्जरी करतील?

गरीब जनतेच्या विश्वासाला तडा नको : आमलान बिश्वास

अपर जिल्हाधिकारी, नोडल अधिकारी पोहोचले बीम्समध्ये

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.