belgaum

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बेळगाव शहरातील सामाजिक संस्थांच्या सहयोगातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

bg

‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून बेळगावच्या सदाशिव नगर येथील वैकुंठ स्मशानभूमीत 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्याहस्ते ही रोपे लावण्यात आली. मजदूर नवनिर्माण संघ, जिवन विद्या मिशन, युथ फाॅर नेशन, बेळगाव ट्रेडर्स, डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशन, एचईआरएफ, महानगरपालिका बेळगावी, ऑपरेशन मदत व बेळगाव व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यावरण दिनाचा कार्यक्रम साजरा केला.

या कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्या हस्ते वडाची झाडे लावून करण्यात आली. यावेळी वड, पिंपळ, आंबा, चिंच, फणस, सिताफळ, जांभूळ, रायआवळा, करंज, चाफा, सावर व लिंबू अशी भारतीय फळझाडांच्या प्रजातींच्या जवळपास 50 एक रोपांची लागवड करण्यात आली.Tree plant

प्रसाद हुली, कार्तिक शहा, प्रशांत बिर्जे, विजय बद्रा, वैभव चव्हाण, राजू टक्केकर, कृष्णा हित्तलमणी, सुरेंद्र अनगोळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला वन विभागाचे प्रशांत जैन व शिवानंद मगदूम, महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे हणमंत कलादगी, स्मशान व गार्डन विभागाचे अधिकारी सतीश कांबळे वाहन विभागाचे अमित गंथाडे, नवीन पाटील, कुमार, स्मशान कर्मचारी व जेसीबी ड्रायव्हर या साऱ्यांच्या सहकार्यातून वृक्षारोपण यशस्वी पार पडले.

युवा सेनेच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिवस

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात रोपटी लावत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी विनायक हुलजी,वैभव कामत,महेश मजुकर,विजय मोहिते,श्वेत तवनशेट्टी आदित्य तिरविर आदी उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.