Tuesday, July 23, 2024

/

निवडणुकीनिमित्त 13 रोजी शाळा -कॉलेजना सुट्टी

 belgaum

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त कर्नाटक सरकारने येत्या 13 जून 2022 रोजी विजयापुरा, बागलकोट, म्हैसूर, बेळगाव, चामराजनगर, मंड्या, हासन, धारवाड, हावेरी, गदग आणि कारवार येथील शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे.

सरकारचा हा निर्णय सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा -कॉलेजेसना लागू असणार आहे. कर्नाटक वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या सोमवार दि 13 जून 2022 रोजी होणार आहे. या निवडणुकीत वायव्य शिक्षक मतदार संघात 12 उमेदवार तर पदवीधर मतदारसंघांमध्ये 11 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

कर्नाटक वायव्य शिक्षक मतदारसंघांमध्ये एकूण 25 हजार 388 मतदार असून यामध्ये बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील 17,238 पुरुष आणि 8,150 महिला मतदारांचा समावेश आहे. कर्नाटक वायव्य पदवीधर मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या 99 हजार 578 असून यामध्ये बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील 71,040 पुरुष आणि 28,554 महिला मतदारांचा समावेश आहे.

कर्नाटक पश्‍चिम शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या 17 हजार 973 असून यामध्ये कारवार, धारवाड हावेरी व गदग जिल्ह्यातील 10,983 पुरुष आणि 6,990 महिला मतदारांचा समावेश आहे.

या पद्धतीने तिन्ही मतदारसंघांमधील सुमारे 1.40 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावून रिंगणातील उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. येत्या 13 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.