Friday, March 29, 2024

/

मुडलगीत 7 भ्रूणांची हत्या; तपास पथक स्थापन -डीएचओ

 belgaum

मुडलगी गावामध्ये तब्बल 7 भ्रूणांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. महेश कोणे यांनी आज याबाबतची माहिती दिली.

बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी गावात मृतावस्थेतील 7 भ्रूण आढळून आले आहेत. सदर मृत भ्रूण 5 डबे -बरण्यामध्ये घालून गावातील एका पुलाखाली टाकण्यात आले होते. याप्रकरणी ग्रामपंचायतीने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

मृत सातही भ्रूण 8 महिन्यांचे असून त्यांना स्थानिक हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहे. पोलिसात रीतसर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सर्व मृत भ्रूण बेळगावला आणून त्यांची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.Dho kone

 belgaum

माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार कोणी केला? मृत भ्रूण त्या ठिकाणी कोठून आले? या अनुषंगाने तपास कार्य हाती घेण्यात आले आहे. भ्रूणहत्येच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन त्यांच्या सल्ल्यानुसार या पथकाची रचना करण्यात आली आहे, अशी माहितीही जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश कोणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.