Saturday, December 7, 2024

/

क्षुल्लक कारणावरून मच्छीमाराला मारहाण

 belgaum

क्षुल्लक कारणावरून एका मच्छीमार तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावामध्ये घडली आहे.

शंकर पाटील (रा. हुंच्यानटटी) असे मारहाण झालेल्या मच्छीमार तरुणाचे नाव आहे. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या शंकर याला गावातीलच कांही तरुणांनी हल्ला करून मारहाण केली.

या मारहाणीत शंकरच्या डोक्याला आणि हातांना दुखापत झाली असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तलावात मासे पकडत असताना नावगे गावातील कांही तरुणांनी तिथे येऊन आपल्याला मासे पकडण्याबद्दल जाब विचारला. तेंव्हा मराठी येत नसल्याचे सांगताच त्या युवकांनी आपल्याला मारहाण केल्याचे शंकर याने प्रसारमाध्यमांना सांगितले.

दरम्यान भाषेच्या वादातून हा हल्ला झाल्याचे जखमी शंकरने सांगितले असले तरी पोलीस तपासाअंती घटनेचे सत्य समोर येणार आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.