Tuesday, May 14, 2024

/

वडगावात कामगाराचा गळा चिरून खून,

 belgaum

बेळगाव शहरातील वडगाव नाझर कॅम्प येथील सार्वजनिक विहिरीजवळ आज गुरुवारी सकाळी एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे.

मृत व्यक्तीचे नाव शंकर उर्फ बाळू पाटील (वय 46) आहे. तो यरमाळ रोड वडगांव येथील रहिवासी आहेमयत व्यक्ती सेन्ट्रीग कामगार असून गळा चिरून त्याचा मृतदेह बाकावर ठेवण्यात आला आहे.

महिनाभराच्या काळामध्ये बेळगाव शहरांमध्ये झालेला हा चौथा खून हे बेळगाव शहरांमध्ये कुणाची साखळी ही सुरूच आहे.काही दिवसांपूर्वी भवानी नगर येथे बिल्डरचा तर किल्ला तलावा जवळ महिलेचा,मारिहाळ जवळ एका इसमाचा तर मच्छे येथे एकाचा खून झाला होता.खुनाच्या घटनांचे सत्र शहर परिसरात सुरूच आहे.

 belgaum

दरम्यान सकाळी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे वडगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी बघ्यांची ही मोठी गर्दी झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.