आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ( इस्कॉन) च्या वतीने काढण्यात आलेल्या राधा कृष्ण गौरव निताय हरेकृष्ण रथयात्रेस रविवारी सकाळी दहा वाजता नाथ पै चौक शहापूर येथून प्रारंभ झाला.
इस्कॉनचे परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते आर्च विग्रहांची पूजन करुन यात्रेस प्रारंभ करण्यात आला. शहापूर विभागातील पोलीस अधिकाऱ्यानिही उपस्थित राहून यात्रेस चालना दिली.
नाथ पै चौका वरून हरिनामाच्या गजरात वाजत गाजत निघालेली ही रथयात्रा बेळगावकरांचे खास आकर्षण ठरली होती. सजवलेल्या रथामध्ये श्री राधाकृष्ण आणि गौरव निताय यांचे सुशोभित केलेले आर्चवीग्रह दर्शनासाठी ठेवण्यात आले होते .एका वेगळ्या रथावर इस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांची मूर्ती ठेवण्यात आला होता.
त्या पुढे सजवलेल्या बैल जोड्या आणि भगवंताच्या जीवनावरील प्रसंग दर्शवणारे काही चित्र रथ सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनाम संकिर्तन करणाऱ्या भक्तांचे समूह सहभागी झाले होते.
वेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी झेंडे घेऊन भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचणारे युवक व युवती सहभागी झाल्या होत्या एका बाजूने स्त्रिया तर दुसऱ्या बाजूने पुरुष दोरखंडाने रथ ओढत होते रथावर श्री भक्ती रसामृत स्वामी महाराज हेही विराजमान झाले होते. रथयात्रा खडेबाजार शहापूर मार्गे बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊन तेथून पुढे मार्गस्थ झाली आहे