मंदिर परिसरात ठेवण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्तीचे संकलन करण्याचे कार्य सर्व लोक फाउंडेशन कडून सुरूच आहे.
रविवारी हनुमान मंदिर ,हनुमान नगर बेळगाव येथे सर्व लोक सेवा फौंडेशन बेळगावच्या वतीने भग्न झालेल्या प्रतिमांचे संकलन करण्यात आले.
शहरातील हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात भग्न झालेल्या प्रतिमा टाकलेल्या होत्या काही भाविकांनी अजाणतेपणी त्या दहन करून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला पण अर्धवट जळलेल्या प्रतिमांमुळे त्यांचे आणखी विद्रुपीकरण आले हे हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांच्या लक्षात आले व त्यांनी तात्काळ सर्व लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला आणि लगेचच सर्व लोक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष व त्यांची टीम मंदिर परिसरात पोहचली आणि त्यांनी काळजीपूर्वक सदरच्या प्रतिमांचे संकलन केले .
व यापुढे अशा प्रकारच्या भग्न प्रतिमा असतील तर लोकांनी सर्व लोक सेवा फौंडेशन शी संपर्क करावा असे आवाहन श्री.विरेश बसय्या हिरेमठ यांच्यावतीने करण्यात आले यावेळी सोबत .सुरेश हंचमनी, .हनुमान मंदिराचे पुजारी,.गुरुराज वाली, .बाळू कणबरकर,. यल्लेश होळकर आदी उपस्थित होते.