सायकली वरून जाणाऱ्या व्यक्तीला गुडस वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकल स्वार युवक घटनास्थळी मयत झाल्याची घटना पिरनवाडी येथे रविवारी सकाळी घडली आहे.
शब्बीर कुतुबुद्दीन पळशीकर वय 35 रा. पिरनवाडी बेळगाव असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव जांबोटी रस्त्यावर दुर्गा कॉम्प्लेक्स जवळ ही घटना घडली आहे.सायकली वरून जाणाऱ्या युवकाला मालवाहू गाडीने जोराची धडक दिल्याने सदर सायकल स्वार जागीच ठार झाला आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. शब्बीर हा बाजाराला जाण्यासाठी या रस्त्यावरून पिरनवाडी गावांमधून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जात होता त्यावेळी हा अपघात घडला आहे
पिरनवाडी परिसरात या रोडवर नेहमी गर्दी असते ट्राफिक जाम सदृश परिस्थिती असते अशा परिस्थितीमध्ये या काही दिवसात या रस्त्याचे देखील रुंदीकरण होणार आहे त्यातच असे रस्त्यावर अपघात देखील वाढू लागले आहेत.