Tuesday, May 28, 2024

/

वीज कोसळून महिला ठार

 belgaum

शनिवारी सायंकाळी बेळगाव सह सीमाभागात जोरदारपणे आलेल्या वळीव पावसात वीज कोसळून महिला ठार झाली आहे.

बेळगाव खानापूर आणि चंदगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तुडिये जवळील बेटगिरी येथील सौ. मनिषा दत्तू गुरव (वय 42) यांचा अंगावर वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला.

शनिवारी सायंकाळी वीजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. यावेळी मनिषा काजू वेचत होत्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली.Lightening

 belgaum

त्यांना गंभीर अवस्थेत बेळगावच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; परंतू तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यांनी तातडीने खानापूर येथून पोलिसांना सोबत घेऊन बेळगावला धाव घेतली. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.