Friday, March 29, 2024

/

राज्यस्तरीय स्पर्धेत उमेश गंगणेचे सुयश

 belgaum

गोकर्ण येथे आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू उमेश लक्ष्मण गंगणे याने सुयश मिळविताना रौप्य पदकासह ‘बेस्ट पोझर’ हा किताब पटकाविला आहे.

गोकर्ण येथे काल रविवारी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावचा होतकरू शरीरसौष्ठवपटू उमेश गंगणे याने 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावण्याबरोबरच ‘बेस्ट पोझर’ हा किताब देखील हस्तगत केला. उमेश हा शहापूर येथील कॉर्पोरेशन जिम्नॅशियममध्ये व्यायामाचा सराव करतो.

Umesh gangne

 belgaum

उमेश गंगणे हा 2010 सालापासून शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. त्याने आत्तापर्यंत जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एकूण 44 सुवर्ण, 18 रौप्य आणि 5 कांस्य पदक, त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेत 36 सुवर्ण, 21 रौप्य आणि 16 कांस्यपदक पटकाविली आहेत.

याव्यतिरिक्त ‘बेस्ट पोझर’ हा किताब त्याने आजतागायत एकूण तब्बल 22 वेळा हस्तगत केला आहे हे विशेष होय. शरीरसौष्ठवासाठी उमेशला पाॅलिहैड्राॅनशउद्योग समूहाचे प्रोत्साहन लाभत आहे. गोकर्ण येथील शरीरसौष्ठव स्पर्धेतील कामगिरीबद्दल उमेश गंगणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.