Thursday, April 25, 2024

/

6 ‘बोगस परीक्षार्थी पोलिसांच्या ताब्यात’

 belgaum

एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेच्या आजच्या पहिल्याच दिवशी चिकोडी शहरात अधिकृत परीक्षार्थींच्यावतीने परीक्षा देण्यास आलेल्या 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले आहे.

राहुल किळ्ळीकेतर (रा. गुडगिरी, ता. गोकाक) भीमशी हुलीकुंद (रा. कोकणीवाडी), कार्तिक कुंबार (रा. कोप्प एस.के. ता. बिळगी जि. बागलकोट),

सिद्दु महादेव जोगी (रा. चिक्कलकोप्प), महांतेश संगप्‍पा डोळ्ळीनवर (रा. गिरसागर), सरिता महादेव होसुर (रा. चिमड ता. बनहट्टी जि बागलकोट) अशी या बोगस परीक्षार्थींची नावे आहेत.

 belgaum

राज्यभरात आज सोमवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला आहे. चिक्कोडी शहरात या परीक्षेच्या आजच्या पहिल्याच दिवशी एका केंद्रामध्ये बहिस्थ विद्यार्थ्यांच्यावतीने परीक्षा देण्यास आलेल्या उपरोक्त 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले. शिक्षण खात्याचे अधिकारी हॉल तिकीट पडताळणी करताना हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

सदर बोगस परीक्षार्थी अधिकृत बहिस्थ विद्यार्थ्यांच्यावतीने परीक्षा देण्यात आले होते. त्यांना शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांची चौकशी केली व त्यांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.