Saturday, April 27, 2024

/

‘शॉर्टसर्किटने दुकानाला आग’

 belgaum

शॉर्टसर्किटने आग लागून केक बनविण्याच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानातील एकूण जवळपास 70 हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी रात्री ताशिलदार गल्ली येथे घडली.

कपिलेश्वर रोड ताशिलदार गल्ली येथील ‘स्प्रिंकल्स केक मटेरियल्स’ बिल्डींग मालक इराप्पा महादेव जुवेकर  व दुकानं। मालक दत्ता लोहार यांच्या मालकीच्या दुकानाला काल रविवारी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले.Burnt

दुकानाला लागलेल्या आगीमध्ये केक तसेच केक बनविण्याचे साहित्य असा सुमारे 55 हजार रुपयांचा माल पूर्णपणे जळून गेला.

 belgaum

त्याचप्रमाणे होळी सणानिमित्त दुकानांमध्ये जवळपास 17 हजार रुपयांचे होळीचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

हे साहित्य देखील आगीमध्ये जळून खाक झाले आहे. सदर दुर्घटनेमुळे इराप्पा महादेव जुवेकर यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.