Friday, March 29, 2024

/

किल्ला तलावाजवळ घडला भर दुपारी खूनाचा थरार

 belgaum

घटस्फोटा बाबत कोर्टात खटला सुरू असलेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली आहे.हिना कौसर नदाफ वय 24 वर्ष राहणार चिंच मार्केट उज्वल नगर बेळगाव असे या मयत महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाच्या जवळ घडलेल्या या खून नाट्याचा थरार पहाण्यासाठी शेकडो गर्दी केली होती आपल्या पत्नीचा धारधार शास्त्राने खून करून पती घटनास्थळीच होता त्याचे नाव मंजूर इलाही नदाफ वय 35 असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल यावर व्हायरल झाला होता घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हिना कौसर या उज्वल नगर येथे राहत होत्या त्यांचा बैलहोंगल येथील मंझुर याच्याशी  विवाह झाला होता दोघांच्यात भांडण झाल्याने कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आज सुनावणीही झाली होती अशी माहिती मिळाली असून नेमकं  खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.Killa murder

 belgaum

शुक्रवारी झालेल्या कोर्टातील सुनावणीच्या तारखेला दोघेही पती-पत्नी हजर झाले होते त्यानंतर पतीने हिना कौसरचा पाठलाग करीत किल्ला तलावाजवळ धारदार शस्त्राने भोसकून खून केला.खून केल्यावर आरोपी पती घटनास्थळीचं उभा होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मागील आठवड्यात मध्ये भवानी नगर येथे बिल्डर याचा खून झाला होता त्या प्रकरणाचा उलगडा होतो न होतो तोच बेळगाव शहराला ह्या दुसऱ्या खून प्रकरणाने हादरवले आहे.किल्ला तलाव खून प्रकरणी माळ मारुती पोलीस पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलिस निरीक्षक सुनील पाटील अधिक तपास करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.