Sunday, May 5, 2024

/

फोटोशूटला गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू!

 belgaum

हिडकल जलाशय परिसरात फोटोशूटसाठी गेलेल्या तरुणाचा तलावात तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशय परिसरात हि घटना घडली आहे.

हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी गावातील जिहाद मसूद शरीफ (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे. निडसोशी पॉलिटेक्निक महाविद्यालयात सदर युवक शिकत होता, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. आज घटप्रभा नदीच्या हिडकल डॅम येथे मित्रांसमवेत फोटोसेशनसाठी हा युवक गेला होता. नदीपात्रात तोल गेल्याने हा युवक बुडाला आणि यादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी यमकनमर्डी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली आहे. नदीपात्रातून युवकच मृतदेह काढण्यात यश आले असून तरुणाच्या कुटुंबियांना माहिती पोहोचविण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या तरुणाच्या कुटुंबियांनीं यावेळी एकच आक्रोश केला. यमकनमर्डी पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.