Saturday, May 4, 2024

/

आमदारांनी घेतली भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची भेट

 belgaum

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण असे मानले जाणारे भाजप नेते बी एल संतोष यांची भेट घेतली.

बेनके सध्या गोवा येथीलविधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार कार्यात गुंतलेले आहेत गोवा मधल्या सावर्डे या विधानसभा मतदारसंघाचे ते प्रभारी असून गणेश गावकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत .गणेश गावकर हे भाजपा उमेदवार निवडणुकीत नक्कीच जिंकतील असा असा विश्वास उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी संतोष यांच्याकडे व्यक्त केला.यावेळी बेळगाव भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.

बेळगाव जिल्ह्यातील अनेक नेते भाजप काँग्रेस किंवा इतर असोत गोवा विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार कार्यात गुंतलेले आहेत.एकीकडे बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांची टीम देखील गोव्यात तळ ठोकून प्रचार करत असताना भाजपच्या नेत्यांनी देखील कंबर कसली आहे.

 belgaum

Benke bl santosh

काँग्रेस कडून अंजली निंबाळकर यांच्यासह अनेक काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या प्रचारासाठी उतरले तर भाजपकडून अनिल बेनके यांच्यासह अनेक नेत्यांनी वेगळ्या मतदारसंघात आपली ताकद पणाला लावली आहे.

एकूणच बेळगाव जिल्हा असो किंवा बाजूचा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा असो बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आता गोव्यात निवडणुकीत पडले त्यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.