Friday, March 29, 2024

/

टिप्परच्या ठोकरीने मोटरसायकलस्वार जागीच ठार

 belgaum

भरधाव टिप्पर आणि मोटरसायकल यांची धडक होऊन घडलेल्या अपघातात आंबेवाडीचा एक युवक जागीच ठार झाल्याची घटना सकाळी 10:30 च्या सुमारास हिंडलगा बॉक्साईट रोडवर आंबेवाडी क्रॉस जवळ घडली.

अपघातात ठार झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नांव निखिल बसवंत कातकर (वय 24, रा. आंबेवाडी) असे आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, आज सकाळी साडे दहाच्यासुमारास निखिल बसवंत कातकर हा आपल्या मोटरसायकलवरून हिंडलगा बॉक्साईट रोड मार्गे जात होता.Tipper

त्यावेळी बॉक्साइट रोड मार्गे सुळगाकडे भरधाव जाणाऱ्या टिप्परने (क्र. केए 22 बी 1389) मोटर सायकलला जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील निखिल कातकर जागीच ठार झाला.

 belgaum

सदर अपघाताची बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. अपघात घडताच भयभीत चालक टिप्पर सोडून घटनास्थळावरून फरारी झाल्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.