Friday, March 29, 2024

/

किर्तनकार लक्ष्मी पोतदार यांना पुरस्कार

 belgaum

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कलांनकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. कारण तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्यासाठी आपण चांगल्या कलागुणांचा विकास करण्यापेक्षा त्यांना नाकारत चाललो आहोत. संगीत असो वा इतर लोककला आपण जपण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात आपण कार्य करत असताना सामाजिक बांधिलकी जपून कार्य केले तर चांगले होईल. आज आपण सर्वच क्षेत्रात पुढे जात आहोत पण माणूस माणसापासून दूर जात आहे ते कुठेतरी थांबले जावून माणुसकी जपण्यासाठी प्रत्येकांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. असे प्रतिपादन प्रा. संगीता शेंबेकर ( मुंबई ) यांनी केले.

रविवार दि.०२ जानेवारी,२०२२ रोजी नवरत्न परिवार व साई प्रकाशन ,मिरज तर्फे संपन्न झाले.मिरज येथ साई साई प्रकाशनचे वतीने नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ पार पाडला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित सांगीता शेबेकर मुबंई व प्रा दिपाली आतिश सोसे अकोला तसेच साई प्रकाशनचे प्रकाशक प्रा प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन व फोटो पुजन व संदेश वाचन तसेच दिवंगतात आदरांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविक प्रा प्रकाश कुलकर्णी मिरज यांनी केले विविध पुरस्कार मध्ये वैशाली जोगळेकर यांना जयवंत कुलकर्णी स्मृती पुरस्कारसमाजसेविका व किर्तनकार सौ. लक्ष्मी पोतदार ( बेळगांव ) यांना अध्यात्मिक पुरस्कार , रेखा कुलकणी धुळे यांना सामाजिक सेवा पुरस्कार साहित्य सेवा हर्षाली करवे यांना नवरत्न विशेष साहित्य पुरस्कार प्रदान केले  डॉश्रीपाद जोशी यांना अमृत योग निमित्ताने प्रातिनिधिक सत्कार व सन्मान पत्र प्रा प्रकाश कुलकर्णी वाचन झाले.Kirtan award

 belgaum

यावेळी वकील शुभदाकुलकर्णी, रेखा कुलकर्णी, प्रा. ए.एस. गोडसे, प्रा.एन.एन. शिंदे , अनिता खाडिलकर ,शिल्पा मैंदर्गी, नीला देवल ,निता शिराळकर , शुभदा कुलकर्णी , डाॕ.विजयकुमार मानेया कार्यक्रमास डाॕ. दीपाली सोसे,अॕड.शुभदा कुलकर्णी,रेखा कुलकर्णी ,अंजली गोखले या बरोबरच अकोला,सातारा,धुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथील कवी व रसिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.प्रकाश कुलकर्णी यांनी केले तर .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय पाठक यांनी केले. आभार अंजली गोखले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.