बेळगाव लाईव्ह : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ, शहापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.
रविवारी दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी गार्डन येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.
तसेच मंगळवार दि. 21 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता बॅरिस्टर नाथ पै चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा उद्घाटन समारंभ होणार असून त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ होईल.

मिरवणुकीचा मार्ग शहापूर खडे बाजार, श्याम प्रसाद मुखर्जी रोड, ब्रिज मार्गे स्टेशन रोड, अंबा भवन, सेंट मेरी हायस्कूल मार्गे कॅम्प येथील उभा मारुतीकडून संभाजी चौक येथे पोहोचून मुख्य मिरवणुकीत सहभाग घेण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना पदाधिकारी, शिवप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष नेताजी जाधव, माजी उपमहापौर संजय शिंदे आणि श्रीकांत प्रभू यांनी केले आहे.





