Friday, March 29, 2024

/

खानापूर समिती बैठकीत आमदार खासदारांच्या निषेधाचे ठराव

 belgaum

मराठी भाषिकां विरोधात गरळ ओकणाऱ्या आमदार खासदारांच्या सह माजी आमदारांचा देखील निषेधाचा ठराव खानापूर तालुका समितीच्या बैठकीत मांडण्यात आला.

खानापूर तालुका म ए समितीची महत्वाची बैठक शिवस्मारक येथे दुपारी २ वाजता संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी म ए समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील होते. प्रास्ताविक व स्वागत म ए समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.

भाषणात दिगंबर पाटील यांनी खानापूर तालुक्यातील ईटगी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी खानापूर तालुक्याच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी मराठी भाषिकांच्या विरोधात वादग्रस्त वक्त्यव्य करून तालुक्यातील मराठी भाषिकांचा अवमान केला आहे. आणि तश्या प्रकारचे चित्रफीत पसरत आहे, मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येऊन मराठी भाषिकांच्या विरोधात अवमानकारक शद्ब उच्चरून राजद्रोहाचा गुन्ह्याला खात पाणी घालणाऱ्या आमदार सौ अंजलीताई निंबाळकर यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

 belgaum

तसेच कारवार मतदार संघाचे खासदार अनंतकुमार हेगडे यांना खानापूर तालुक्यातून ५ वेळा भरगोस मतदान करून निवडून आणले आहे त्यांनी देखील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक अवाक्षरही काढले नाही त्यांचाही जाहीर निषेध करण्यात आला.

खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये दुफळी पडून दोन गट कार्यरत आहेत दोन्ही गटांमध्ये एकोपा करण्यासाठी प्रयत्न चालू असताना म ए समितीच्या नावाखाली निवडून आलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांनी एकी होऊ नये यासाठी धमकी सत्र चालू केले आहे असा आरोप करत त्यांचाही सभेने निषेध केला. म्हणून मराठी भाषिक जनतेने एकसंघ राहून मराठी भाषिकांच्या पाठीत खंजीर खूपसणार्यांपासून सावध रहावे असे आवाहन केले.

येत्या १७ जानेवारी रोजी हुतात्मा स्मारक स्टेशन रोड खानापूर येथे सकाळी ठीक ८.३० वाजता म ए समितीच्या दोन्ही गटांनी उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन केले.

या सभेच्या वेळी अनिल पाटील माजी नगरसेवक , विलास बेळगावकर माजी जि पं सदस्य ,प्रकाश चव्हाण, विवेक गिरी, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे मुरलीधर पाटील , अविनाश पाटील , विशाल पाटील , पुंडलिकराव चव्हाण , रुक्माना जुंजवाडकर , विठ्ठल गुरव , शंकर गावडा , कृष्णा कुंभार , डी एम गुरव इत्यादींनी निषेधात्मक विचार व्यक्त केले . शेवटी महादेव घाडी यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.