Sunday, April 28, 2024

/

अज्ञाताने दगडफेक करून फोडल्या कारच्या काचा

 belgaum

घरासमोर पार्क केलेल्या कारगाडीच्या काचा अज्ञातांनी दगडफेक करून फोडल्याची घटना रविवारी मध्यरात्री एसपीएम रोडवरील शिवाजी उद्यानासमोर घडली.

दगडफेक करण्यात आलेली कारगाडी माईन्स ओनर्स अँड मिनरल ट्रेड्स असोसिएशनचे (द मोमटा) चेअरमन नितीन म्हाडगुत यांच्या मालकीची आहे.

याप्रकरणी निधी नितीन म्हाडगूत यांनी खडे बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. म्हाडगुत यांनी आपली केए 22 एमबी 0051 क्रमांकाची टाटा टियागो कार रविवारी नेहमीप्रमाणे आपल्या घरासमोर उभी केली होती. मध्यरात्रीनंतर स्वतःचा चेहरा झाकलेल्या एका अनोळखी व्यक्तीने कारवर दगडफेक करून दर्शनीय, पाठीमागील आणि दरवाजाच्या काचा फोडल्या आहेत.

 belgaum

Car glass

दगडफेकीच्या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यासंबंधी खडे बाजार पोलिसांत भादवि 427 कलमान्वये अज्ञांता विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दगडफेक करणारी कानटोपी आणि स्कार्फने आपला चेहरा झाकलेली सदर अज्ञात व्यक्ती नजीकच्या एका सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले आहे.

नितीन म्हाडगुत यांनी कर्नाटकातील 50 हजार शेतकऱ्यांना आपल्यापरीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा व्यक्तीच्या कारगाडीचे नुकसान करण्यात आल्यामुळे तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.