Sunday, April 28, 2024

/

बेळगाव शहराला यंदा मेपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा शक्य

 belgaum

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावणे दोन फूट अधिक पाणी आहे. मात्र हिडकल जलाशयात 3.15 टीएमसी कमी पाणी असले तरीही यंदा बेळगावकरांना मेपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

यंदा नोव्हेंबरमध्ये देखील दमदार अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे जलाशयाच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली होती. राकसकोप जलाशयाची पाणी साठ्याची क्षमता अर्धा टीएमसी म्हणजेच 2,477.00 फूट आहे.

काल राकसकोप जलाशयात 2,473.25 फूट पाणी होते, तर गेल्या वर्षी 3 जानेवारीला 2471.55 फूट पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.7 फूट पाणी अधिक आहे.

 belgaum

हिडकल जलाशयातची पाणी साठ्याची क्षमता 51 टीएमसी आहे. सध्या या जलाशयात 37.3 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी या कालावधीत हा पाणीसाठा 40.45 टीएमसी इतका होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या जलाशयात 3.15 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. सध्या हिडकल जलाशयातून दररोज 5008 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, सध्या शहराला पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे शहरवासीयातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही जलाशयात मुबलक पाणी साठा असूनही पाणी वेळेवर का सोडले जात नाही? अशा तक्रारी होत आहेत. बेळगावच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टी कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.