Thursday, April 25, 2024

/

राजद्रोहाच्या गुन्ह्यातील आणखी एकाला जामीन

 belgaum

राजद्रोह गुन्ह्यातील आणखी एका अल्पवयीन मुलाला जिल्हा द्वितीय उच्च दिवाणी न्यायालयाने आज गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला 17 वर्षीय मुलगा हा दत्तगल्ली वडगाव येथील रहिवासी आहे.

अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायान्ना पुतळा विटंबना प्रकरणी काल आठवे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुरज भरमा कंग्राळकर आणि ज्योतिबा मोहन भांदुर्गे दोघा युवकांना सशर्त जामीन मंजूर केला होता.

 belgaum

त्यानंतर आज साक्षीदाराला धमकावून नये, प्रत्येक तारखेला कोर्टात हजर रहावे, एक जामीनदार व 25 हजार रुपयांचे हमीपत्र या अटींवर दत्तगल्ली येथील मुलाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर  संशयित अल्पवयीन मुलाच्या बाजूने न्यायालयात ॲड. प्रताप यादव यांनी युक्तिवाद मांडला.

शिवराय अवमान विरोधी आंदोलनातील अटक झालेल्याना कधी जामीन मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.