Tuesday, April 23, 2024

/

मेळाव्या बाबत बेळगाव शिवसेनेचे आवाहन

 belgaum

सीमा भागातील मराठी माणसाला मदत करण्यात शिवसेना नेहमी पाठीशी राहिली आहे बेळगावात देखील शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्याला खांदा लावून लढत आली आहे.

आगामी 13 डिसेंबर रोजी कर्नाटक अधिवेशन विरोधी महा मेळाव्याला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. नुकतीच एक बैठक घेऊन शिवसेना संपर्क प्रमुख आर्विद नागणुरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटक सरकार नेहमीच सिमाभागातील मराठी जनतेला त्रास देण्याचे काम करत आहे त्याला प्रत्यकवेळेला शिवसेना नेहमीच मराठी बांधवांच्या पाठीशी राहीली आहे बेळगावातील मराठी जनतेने महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन करण्यात आले.

 belgaum

या बैठकीला शिवासेना संपर्क प्रमुख अरविंद नागणुरी उपजिल्हा प्रमुख बंडु केरवाडकर शहर प्रमुख दिलीप बैलुरकर उपशहरप्रमुख प्रविन तेजम उपशहरप्रमुख राजु तुडयेकर तालुका प्रमुख सचिन गोरले दत्ता जाधव चंद्रकांत कोडुसकर प्रकाश राऊत राज कुमार बोकडे तानाजी पावशे पिराजी शिंदे विनायक जाधव प्रदीप सुतार राजु कोनेरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.