Wednesday, April 24, 2024

/

हायवेवरील अपघातात तिघे ठार

 belgaum

हिरेबागेवाडीनजीक विरपणकोप्प क्रॉस येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर आज सकाळी भरधाव कारने लाॅरीला धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार तर अन्य दोघे जखमी झाले. अपघातातील मृत कारवार जिल्ह्यातील यल्लापूरचे रहिवासी आहेत.

वासिम खान (वय 40) सय्यद इस्माईल दाऊद (वय 65) आणि सुशीला फर्नांडिस (वय 60) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. त्याचप्रमाणे जावेद (वय 41) आणि मुक्तियार सय्यद (वय 60) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

धारवाडकडून भरधाव वेगाने बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कार गाडीने राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर विरपणकोप्प क्रॉस येथे समोर चाललेल्या लाॅरीला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती कि कारगाडीतील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

 belgaum

जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.